[an error occurred while processing this directive]

श्रीसद्‍गुरुलीलामृत

श्रीसद्‌गुरु ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर
यांचे ओवीबद्ध चरित्र

लेखक : कै. गोपाळ विष्णु फडके


लेखक परिचय

अध्याय पहिला

अध्याय दुसरा

अध्याय तिसरा

अध्याय चवथा

अध्याय पाचवा

अध्याय सहावा

अध्याय सातवा

अध्याय आठवा

अध्याय नववा

अध्याय दहावा

अध्याय अकरावा

अध्याय बारावा

अध्याय तेरावाश्रीमहाराजांच्या चरित्रपर कांही ग्रंथ गेल्या कांही वर्षांतच उपलब्ध झालेले आहेत. परंतु तत्पूर्वी जिज्ञासूंना व भक्‍तमंडळींना माहितीपर व मार्गदर्शनपर असा 'श्रीसद्‌गुरुलीलामृत' हा एकमेव ग्रंथ उपलब्ध होता व त्या दृष्टीने या ग्रंथाचे महत्त्व आगळे आहे. याचे रचयिता श्री. गोपाळराव हे श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद प्राप्त झालेल्या विशेष भक्‍तमंडळींपैकी एक होते. या ग्रंथाचे वाचन करीत असतांना त्यांची सद्‌गुरुभक्‍ति, परमेश्वर प्राप्तीची ओढ, श्रद्धा व ज्ञान यांचा जागोजागी प्रत्यय येतो.

श्री गोपाळरावांनी प्रथम चरित्रवजा " नमस्कारत्रयोदशी " हे तेरा श्लोक लिहिले जे श्रीमहाराजांचे भक्‍त मंडळींना परीचित आहेतच. ते श्लोक पाहून श्रीब्रह्मानंद महाराजांनी त्यांना श्रीमहाराजांचे चरित्र लिहिण्याची अनुज्ञा दिली. त्याप्रमाणे श्री गोपाळरावांनी इ. स. १९१८ च्या पुण्यतिथीचे दिवशी गोंदवले येथें चरित्र लिहिण्यास प्रारंभ केला आणि "श्रीसद्‌गुरुलीलामृत" १९२२-२३ साली प्रथम प्रसिद्ध झाले. पुढे तीस वर्षांनी श्रीसंस्थान मार्फत दुसरी आवृत्ति प्रसिद्ध होऊन त्यानंतर श्रीसंस्थानचे मार्फत आता उपलब्ध असलेली सन्‌ २००५ ची ही १३ वी आवृत्ति.

अशा ग्रंथाची जगभर पसरलेल्या भक्‍तांना वाचन/पारायणाची इच्छा असूनही कधीकाळी 'सध्या ग्रंथ जवळ उपलब्ध नाही' म्हणून वाचता येत नाही या कारणास्तव त्यांना वाचण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये हा हेतु धरून हा ग्रंथ येथे उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्‍न.