श्रीब्रह्मचैतन्यमहाराजांची प्रवचने

संग्राहकाचे निवेदन

मुखपृष्ठ

 

   जानेवारी   

          १५    २२   २९

          १६    २३   ३०

      १०   १७   २४    ३१

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

      फ़ेब्रुवारी

          १५   २२   २९

          १६   २३  

      १०   १७   २४  

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

       मार्च

          १५   २२   २९

          १६   २३   ३०

      १०   १७   २४   ३१

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

       एप्रिल  

          १५   २२   २९

          १६   २३   ३०

      १०   १७   २४   

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

           मे

          १५   २२   २९

          १६   २३   ३०

      १०   १७   २४   ३१

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

        जून

          १५   २२   २९ 

          १६   २३   ३०

      १०   १७   २४   

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

  रामनवमीचे प्रवचन १

  रामनवमीचे प्रवचन २

  रामनवमीचे प्रवचन ३

 

    सूचना / सुधारणा 

    यासाठी  संपर्क  -  

       eko.aham

          ऍट 

      जीमेल.com 

   [ जीमेल=gmail ]


  

         श्रीमहाराजांच्या भक्तांपैकी काहींनी वेळोवेळी लिहून घेतलेल्या श्रींच्या निरूपणाच्या लिखाणांच्या वह्या वाचायला मिळण्याचे भाग्य मला लाभले. श्रींच्या भाषेतील जिव्हाळा, साधेपणा, विचारांचा सखोलपणा, तसेच शिकवणुकीतील निःस्वार्थीपणामुळे व प्रत्यक्ष अनुभवाने आलेला रोखठोकपणा, साध्यासाध्या दृष्टांच्या योगाने गहन विषय उलगडून दाखविण्याची हातोटी व विशेष म्हणजे भगवंताच्या प्रेमाने उचंबळणारी प्रभावी भाषा, या अनेक गुणांनी मन वेधून घेतले. हा अमोल ठेवा सर्वांना उपलब्ध झाला तर माझ्याप्रमाणे अनेकांना तो मार्गदर्शक ठरेल असे मनाने घेतले व हे संकलनाचे काम चालू झाले. कालांतराने, श्रीमहाराजांच्या कृपाप्रसादाने पूजनीय कै. तात्यासाहेब केतकर आणि माझे वडील कै. ती. पंडितराव गोखले यांच्या प्रेमळ प्रोत्साहनाने, तसेच काही गुरुबंधूंच्या सहकार्याने, रोज वाचण्यास उपयुक्त अशा स्वरूपात मांडणी करून हा संग्रह प्रथम इ. . १९६६ मध्ये प्रसिद्ध केला.

        आत्मोन्नतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर पडताळून पाहिलेली व्यवहारी शिकवण, यामुळे सर्वसामान्य मराठी वाचकांची मने एकदम आकृष्ट झाली. अनेक वाचकांच्या जीवनाला सुयोग्य वळण लाभले. ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे व स्वभावानुसार वाचणार्‍यास मार्गदर्शन होऊन अनेकांना समाधानाचा लाभ झाला. कित्येक वाचकांची नामस्मरणाकडे वाढती वृत्ती होऊ लागली. गोंदवल्यास दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर येणार्‍या  जिज्ञासू साधक वर्गाच्या ओघावरून हे सहज दृष्टोत्पत्तीस येईल. परमेश्वराविषयीचे प्रेम वृद्धिंगत होणे, म्हणजे त्याची सतत आठवण होणे, त्याचे नाम घेणाची भावना जागृत होणे, हेच तीर्थक्षेत्रात आल्याचे मुख्य लक्षण आहे. गोंदवल्यास आल्याने नाम घेण्याची वृत्ती होते व पुढे ती दृढमूल होत जाते, असा अनेक साधकांना प्रत्यक्ष अनुभव आला.

        खरे म्हणजे श्रीमहाराजांचे एक प्रवचन जरी वाचले व त्याप्रमाणे श्रद्धेने आचरण करण्याचे ठरविले तरी मनुष्य उद्धरून जाऊ शकेल. "माझे निरूपण ऐकण्याने एक श्रोता जरी नाम घेण्यास प्रवृत्त झाला तरी या सांगण्याचे सार्थक झाले असे मला वाटेल." असे एकदा श्रीमहाराज म्हणाले होते. त्याचप्रमाणे या प्रवचनांच्या वाचनाने एकादा जरी वाचक नाम घेण्यास प्रवृत्त झाला तरी या पुस्तकाचे चीज झाल्यासारखे आहे.

        लोकांना नामाचे महत्त्व पटावे म्हणून श्रीमहाराजांनी किती कळवळ्याने आणि जीव तोडून सांगितले आहे ! नामस्मरणाची आवड लोकांत, " न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥' हा रोकडा अनुभव येईल. अशी स्वानुभवाच्या ठाम बळावर त्यांनी सर्वांना ग्वाही दिली. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्यकर्म चोख बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करणे, हेच श्रीमहाराजांच्या निरूपणाचे सूत्र आहे. "मुखी रामाचे नाम । बाह्य प्रपंचाचे काम । ऐसा राम जोडा मनी ॥" हे त्यांच्या शिकवणुकीचे रहस्य आहे.

        श्रीमहाराजांची ही रसाळ व प्रभावी निरूपणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरोखर धन्य होत; आणि ज्यांनी त्यातले हे अमृतमय बिंदू टिपण्याचे कष्ट घेतले व अशा तर्‍हेने दूरदर्शीपणा दाखविला, त्यांनी हा आपल्यावर मोठा उपकारच करून ठेवला आहे यात शंका नाही. त्यांचे आपण ऋणी आहोत. तसेच, या पुस्तकाच्या संकलनाच्या कामी व पुढील पांच आवृत्त्यांच्या वेळी माझे आदरणीय गुरुबंधु प्रा. प्र. ना. वर्टीकर, श्री अण्णासाहेब मराठे व इतर वडीलधार्‍या मंडळींनी मोठ्या प्रेमाने व आपुलकीने जी मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

        सहाव्या आवृत्तीच्या वेळी या पुस्तकाबाबतचे सर्व हक्क श्रीगोंदवले येथील श्रीमहाराजांच्या विश्वस्त मंडळींवर मी सोपवले आहेत. श्रीमहाराजांच्या प्रेरणेनेच आतापर्यंत सर्व काम झाले व पुढेही होत राहील. विश्वस्त मंडळींनी हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकास कमीत कमी किंमतीत उपलब्ध व्हावा हीच इच्छा धरून हा व्याप स्वीकारला.

        शेवटी पुन्हा एकदा श्रीमहाराजांच्या निरूपणाचे सार मनात ठसावे म्हणून ते उद्धृत करावेसे वाटते; "वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका, नाम घेणार्‍याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका."

        श्रीमहाराजांच्या या प्रवचनांच्या संकलनाच्या निमित्ताने नामाची थोडीफार जी संगत लाभली तिच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जावो व ती शेवटपर्यंत कायम राहो हीच श्रीमहाराजांना कायावाचामने शरण जाऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून, अत्यंत विनम्र भावाने प्रार्थना करतो.

गोविंद सीताराम गोखले

संग्राहक


प्रासंगीक   प्रवचने 

खाली पहा  

   जुलै   

          १५    २२   २९

          १६    २३   ३०

      १०   १७   २४    ३१

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

      ऑगस्ट

          १५   २२   २९

          १६   २३   ३०

      १०   १७   २४   ३१

     ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

       सप्टेंबर

          १५ ;  २२   २९ 

          १६   २३   ३०

      १०   १७   २४  

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

       ऑक्टोबर

          १५   २२   २९

          १६;   २३   ३०

      १०   १७   २४    ३१

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

         नोव्हेंबर

          १५   २२   २९

          १६   २३   ३०

      १०   १७   २४  

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

        डिसेंबर

          १५   २२   २९ 

          १६   २३   ३०

      १०   १७   २४      ३१  

      ११   १८   २५

      १२   १९   २६

      १३   २०   २७

      १४   २१   २८

  दासनवमीचे प्रवचन -

  गुरुपौर्णिमेचे प्रवचन - १

  गुरुपौर्णिमेचे प्रवचन - २